Hind di chadar : ‘बोले सो निहाल… सत श्री अकाल!’ हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने भक्तिभावाचा कळस
नांदेड | ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम वर्षानिमित्त आज नांदेड नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. आकाशात घुमणारा “बोले सो निहाल… सत श्री अकाल” चा जयघोष, हेलिकॉप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी, हजारो भाविकांचा उसळलेला भक्तिभाव आणि शिस्तबद्ध भव्य नगर कीर्तन — या सर्वांनी आजचा दिवस नांदेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला.
या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी येथून प्रारंभ झाला. प्रारंभी गुरुद्वारात विधिवत अरदास करण्यात आली. गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने मानवंदना (Guard of Honor) देण्यात आली. याच वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे दृश्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले....
