Manipulation of sugar distribution | हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो रिकामे पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| शासनाकडून अंत्योदय लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप एप्रील महीन्यात केल्या गेले नसल्याच्या असंख्य तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान हिमायतनगर शहराजवळील पाणी पुरवठा टाकी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो साखरेचे पॉकेट फोडून रिकामी पॉकिटे फेकून दिल्याचा प्रकार आता समोर आला आहे. यावरून अंत्योदय लाभार्थींच्या साखर वाटपात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय बळावला आहे. साखरेचे पॉकेट कोणत्या दुकानदाराने त्यातील साखर काढून घेऊन फेकून दिले याची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
शासनामार्फत अंत्योदय लाभार्थ्यांना माहेवारी साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे नियमित वितरण होत नाही अशी ओरड होऊ लागली आहे. शासन...
