Kinwat Police Action : गुटखा-पानमसाला तस्करी उघड, ९.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
किनवट /नांदेड | जिल्ह्यात अवैध गुटखा व पानमसाला विक्रीवर आळा घालण्यासाठी किनवट पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ९ लाख ७२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धानोरा परिसरात सापळा रचला. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजनिवास पानमसाला, विमल पानमसाला, रजनीगंधा तसेच विविध प्रकारचा जर्दा साठा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी मालासह वाहन जप्त केले असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹9,72,480 इतकी आहे. प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी तपास सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा:
अवैध गुटखा, पा...
