Mahamorcha for Mahabodhi Vihar : महाबोधी विहारासाठी महामोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बिहार सरकारला निवेदन
नांदेड| बिहार सरकारने टेम्पल अॅक्ट १९४९ हा कायदा रद्द करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी महामोर्चा काढण्यात आला. नवा मोंढा मैदान येथून हजारोंच्या संख्येने निघालेला महामोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे बौद्ध भिख्खु आणि शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बिहार सरकारला निवेदन पाठविण्यात आले.
भारताचा महान राजा सम्राट अशोक यांनी भगवान बुद्ध यांचा विचाराचा प्रचार व्हावा यासाठी बिहार येथील गया जिल्ह्यात भगवान गौतम बुद्धाच्या महाबोधी विहाराची स्थापन केली होती. मात्र बिहार सरकारने १९४९ मध्ये बुद्ध गया मंदिर व्यवस्थित नियंत्रणासाठी बुद्धगया टेम्पल अॅक्ट तयार केला. यामुळे विहाराचे व्यवस्थापन अन्य प्रवर्गातील समुदायाकडे गेले आहे.
ज्या प्रमाणे चर्च, गुरूव्दारा, मंदिर याचे त्या त्या समुदायाकडून व्यवस्थापन केल...
