Kailas Tekadi ; जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेनी कैलास टेकडीला जाणारा मार्ग केला सुखकर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। महाशिवरात्रीनिमित्त माहूर गडावरील कैलास टेकडीवर पहिल्या दिवशीपासूनच भाविकांची रेल चेल सुरू झाली असून महाशिवराञी निमित्त हजारोच्या संख्येने भावीक दर्शनासाठी येथे पायी येणार आहेत, जवळपास चार ते पाच किमी अंतर पायी चालत टेकड्या चढून कैलास टेकडीवर दर्शन घेण्यासाठी जावे लागते,परंतु रस्त्यात असलेल्या दगड,गिट्टीने पायी चालणार्या भाविकांना मोठी कसरत करावी लागते.
महाशिवराञीनिमित्त कैलास टेकडी पर्यंत लहान मुले, महिला भाविक येणार असल्याने सदरील रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग , वन विभाग तसेच महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने शेवटी शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी मजुरा द्वारे रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता चालण्यालायक बनविल्याने ते माहूरवासी तसेच पंचक्रोशितील येणार्या भाविकांच्या अभिनंद...
