Rajarshi Shahu Maharaj Mandhan Yojana ; राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी पात्र-अपात्र यादी जाहीर ; हरकतींसाठी १० जुलैपर्यंत मुदत
नांदेड l जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृध्द कलावंत मानधन योजना २०२४-२५ अंतर्गत पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण १ हजार ४३२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९५४ अर्ज पात्र तर ४७८ अर्ज अपात्र ठरले आहेत.
लाभार्थ्यांची पात्र-अपात्र यादी जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर व सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदारांना हरकती व दावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यासाठी ५ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी सुधारित यादी तयार केली जाईल. अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी १० जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी दिली आहे.
अंतिम दिनांकानंत...
