Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL
दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या 'त्रिवेणी' या कवितासंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे होत आहे. यानिमित्ताने कवितासंग्रहाची ओळख करून देणारा डॉ. पृथ्वीराज तौर यांचा लेख देत आहोत.
साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने, त्यांचे भरणपोषण व जोपासणा करण्याच्या दृष्टीने नांदेड शहर मराठवाड्यात अग्रस्थानी आहे. या शहराची स्वतःची स्वतंत्र वाङ्मयीन ओळख आहे, तिला काही शे वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एखाद्याकडे कलेच्या क्षेत्रातील बीजभूमी असेल तर तिला येथे लगेच खतपाणी व पोषक वातावरण मिळते. नांदेडमध्ये राहून लेखन करणाऱ्या साहित्यिकांकडे व त्यांच्या व्यवसायांकडे नजर फिरवली तरी हे सहजच लक्षात येते की या शहराने कित्येकांच्या स्वप्नांना व छंदांना जपून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर ही स्वप्ने साकार करण्यासाठी हातभार लावला आहे.
भिन्न भिन्न व्यवसाय क्षेत्रात...
