Mrs. Sadiccha Vaijnath Soni : चला वाण देऊया संस्कृती जपूया – सौ.सदिच्छा वैजनाथ सोनी यांचा समाजपयोगी उपक्रम
नांदेड| येथील बाबानगर – मगनपुरा भागातील सौ. सदिच्छा वैजनाथ सोनी यांच्या प्रतिष्ठाणावर हंळदी – कुंकू कार्यक्रमाचे आयोजन रथसप्तमीच्या मूहूर्तावर दि.४ फेब्रुवारी मंगळवार रोजी करण्यात आले होते सदरील कार्यक्रमात शाहूनगर,वसंतनगर,मगनपुरा भागातील शेकडो महीलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत वाणाची देवाण-घेवाण करत हळदी – कुंकूवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
या भागातील युवा महीला समाजसेविका असलेल्या सौ.सदिच््छा वैजनाथ सोनी यांनी आपल्या महीला मंचच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका अरुंधती ताई पुरंदरे, युवा नेत्या प्रणिता ताई देवरे चिखलीकर, आ.प्रताप पाटील चिखलीकरांच्या सौभाग्यवती सौ.प्रतिभाताई चिखलीकर, नगरसेवक प्रशांत तिडके यांच्या सौभाग्यवती सौ. सरिता तिडके, संघ समितीच्या नांदेड शहर कार्यवाहक सौ. रेणुताई देशपांडे, इंदिरा कंधारकर...
