Saturday, June 27

Tag: leopard attack in Kinwat

Leopard attack in Kinwat : किनवट तालुक्यात बिबट्याचा धक्कादायक हल्ला

Leopard attack in Kinwat : किनवट तालुक्यात बिबट्याचा धक्कादायक हल्ला

नांदेड, महाराष्ट्र
किनवट/नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पिंपरी येथील शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मौजे पिंपरी येथील शेतकरी व्यंकटराव नागोराव चाटे (वय 70) हे दिवसभर शेतात काम करून बैलगाडीसह घरी परतत असताना, जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या बैलावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे बैल बिथरला आणि बैलगाडी पलटी झाली. या अपघातात व्यंकटराव चाटे गंभीर जखमी झाले असून बैलही जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ जखमी शेतकऱ्याला उपजिल्हा रुग्णालय, किनवट येथे दाखल केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद (तेलंगणा) येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
error: Content is protected !!