Blood camp : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : महिला–पुरुष रक्तदात्यांचा मोठा सहभाग
हिमायतनगर, अनिल मादसवार| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या “जीवनदान महाकुंभ २०२६” अंतर्गत बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शहर व ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत–सत्कार करण्यात आला तसेच शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
हे शिबिर तालुका सत्संग समिती व तालुका सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरु नरेंद्राचा...
