Mahashivratri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे महाशिवरात्री निमित्ताने पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी घेतले दर्शन
नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12वाजे पासून ते दिवसभर तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड येथे पंचक्रोशीतील लाखोभाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
तर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने भाविक भक्तांना दर्शन सुलभ झाले होते, विष्णुपुरी येथे चहा फराळ ,फळे पाणपोई व्यवस्था गावातील सामाजिक कार्यकर्ते व गावकरी यांनी केली होती, सायंकाळी खासदार अशोकराव चव्हाण व आमदार सुजया चव्हाण यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी दर्शन घेतले.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे 26 फेब्रुवारी रोजी महाअभिषेक , नोंदणी पध्दतीने महाअभिषेक, महा...
