Ravindra Chavan ; खा.रवींद्र चव्हाण, खा.डॉ.काळगे यांचे आश्वासन माळेगाव यात्रेला केंद्राचा ‘अ’दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – NNL
नांदेड l दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला केंद्र सरकारचा ‘अ’दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना नांदेडचे खा.रवींद्र चव्हाण आणि लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिल्या. विशेष म्हणजे माळेगाव येथे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठीही प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या दोन्ही खासदारांनी दिले.
माळेगाव येथील खंडोबा यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि नियोजन या संदर्भात खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने बुधवारी दुपारी माळेगाव येथे विशेष बैठक घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी अभिजित ...
