Sunday, June 28

Tag: Kha. Ashokrao Chavan’s meeting

Mp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक

Mp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांसमवेत बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्ग, वन जमिनीचे पट्टे हस्तांतरित करणे आणि पोलीस भरतीतील उमेदवारांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह नांदेड महानगरचे भाजप अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी आदी मंडळी उपस्थित होती. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामध्ये सुपिक शेती व फळबागा संपादित होणार असल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे संरेखन बदलण्यासह विविध पर्यायांवर विचार करण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीत या विषयावर विचारविनिमय करण्यात आला. शेतकऱ्यांनी सुचवलेल्या पर्याया...
error: Content is protected !!