Kavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL
नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड कावड यात्रा काढण्यात आली यंदाची ही कावड यात्रा बांगलादेश मधील हिंदूंवर असलेल्या अत्याचाराला समर्पित ही कावड यात्रा होती.
पाच दहा कावड, एका भक्ताने 40 लिटर कावड तयार करून आणली होती. पाण्याची तर लहान बालकांनी भूत अघोरींचे वैशभुषा साकारून कावड यात्रा मधील नागरिकांचे लक्ष वेधले. कावड यात्रेमध्ये हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नवीन नांदेड सिडको,नांदेड शहर दुम दुमले होते. तसेच जुनामोंढा येथे बांगलादेश विरुद्ध घोषणाबाजी ही करण्यात आली. सिडको पासून ते उर्वशी महादेव मंदिरापर्यंत व्यापाऱ्यांनी तथा शिवभक्तांनी कावड यात्रेचे स्वागत केले. सिडको येथील अण्णा भाऊ साठ...
