Laxity of Forest Range Officers : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे “जंगल में मंगल” – NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| वृक्ष लागवड करून झाडे लावा - झाडे जगवाचा संदेश वनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात दिला जात आहे. परंतु हिमायतनगर येथील वन परिक्षेत्र अधिकारी नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत असल्याने सागवान तस्करांचे "जंगल में मंगल" होत असल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सागवान तस्करात तेलंगणा राज्यातील तस्करांचा समावेश असताना वर्षभरात वनविभागाने सागवान तस्करांच्या बाबतीत एकही कार्यवाही केली नसल्याने वनाधिकाऱ्याच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
एकीकडे सर्वत्र जागतिक तापमान वाढत असल्याचे संकट उभे असताना, दुसरीकडे मात्र लाकूड तस्करामुळे जंगल भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या काळात हिमायतनगर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करून, वृक्ष जोपासना करीत वृक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्य...
