Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL
हिमायनगर,अनिल मादसवार| नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. नववधू सहित महिलांनी श्रियाळ राजाच्या भोवताली गाणे म्हणत गोल फिरत आराधना केली. त्यानंतर सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्याने श्री परमेश्वर मंदिरापर्यंत श्रियाळ राजाची मिरवणूक काढून शिराळबाई शिराळ..... शिराळाच्या लाह्या... असे म्हणत परंपरेनुसार महाआरती करून शंभूच्या नावाने हरहर बोला म्हणत विसर्जन केले.
याबाबात एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे पैठण येथे इतिहास प्रसिद्ध गर्भश्रीमंत शहरात शिराळशेठ के एक सावकार होते. त्या काळात दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार असलेले शिराळशेठ परंतु मनाने उदार होते. त्या काळी त्यांनी स्वत: जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्या...
