Friday, June 26

Tag: is also on white gold

Farmers worried : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांत चिंता — पांढऱ्या सोन्यालाही निसर्गाची अवकृपा

Farmers worried : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांत चिंता — पांढऱ्या सोन्यालाही निसर्गाची अवकृपा

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. नुकतेच सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता काढणीला आलेल्या कापूस पिकावरही निसर्गाची अवकृपा कोसळली आहे. परतीच्या पावसामुळे पांढऱ्या सोन्याच्या वाती झाडावरच फाटून खराब होत असून, वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दिवाळीचा सण संपला तरी अधूनमधून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. एकूणच यंदाचा हंगाम शंभर टक्के नुकसानदायक ठरत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.परतीचा पाऊस थांबला असला तरी आभाळ दाटून येत असल्याने रब्बी पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस सुरू असल्याने मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने नुकत्याच मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. काहींना पहिल...
error: Content is protected !!