पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले; ‘वीज कंपनीला दरवर्षीच पावसाची ऍलर्जी -NNL
हिमायतनगर। सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वाराही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील वीज बंद करण्याचे प्रकार घडत आहेत.थोड्याच दिवसापूर्वीच्या वादळी वारा व विजांचा कडकडाटासह झालेल्या चक्रीवादळाने वीज वितरणचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातून सावरत वीज व्यवस्थित होत नाही तोच आता साधा वारा किंवा पावसाचे थेंबही सुरू झाले म्हणजे वीज वितरण कंपनीकडून वीज गुल केल्या जात असल्याने ग्राहकात त्यांचेप्रति प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
सद्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले एक दोन आठवडे उन्हाच्या झळा सोबतच कधीतरी पावसाच्या सरी कोसळत असतात.त्यामुळे अति प्रमाणात उकाळा होत असल्याने जनता घामाघूम होत पंख्याचा किंवा कुलरचा आसरा घेण्याच्या स्थितीत असतांना शक्यतो ग्रामीण भागात विजेचे अघोषित भारनिय...
