Thursday, May 14

Tag: “Informed voters

Voters : “सुजाण मतदार – लोकशाहीचा जीव”- गोविंद मुंडकर

Voters : “सुजाण मतदार – लोकशाहीचा जीव”- गोविंद मुंडकर

नांदेड, लेख
पैसा, जात, धर्म आणि स्वार्थापलीकडे जाणारा मतदारच देशाचे भविष्य घडवतो. लोकशाही ही केवळ एक राजकीय पद्धती नाही, तर ती प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची, नैतिकतेची आणि सुजाणतेची कसोटी आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सण असला तरी, त्याची खरी शोभा फक्त तेव्हाच वाढते जेव्हा मतदार आपला हक्क समजून, स्वार्थ बाजूला ठेवून, केवळ देशहितासाठी मतदान करतो. आजचा काळ पाहता, चांगला मतदार हा चांगला नेता निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. प्रामाणिक, दूरदृष्टी असलेला आणि सक्षम नेता निवडण्यासाठी मतदाराच्या जागरूकतेला पर्याय नाही. परंतु, जात-धर्माच्या गोटात अडकलेला, पैशाने विकला जाणारा, दारू व इतर प्रलोभनात बुडालेला, आणि स्वार्थासाठी मतदान करणारा मतदार लोकशाहीला मारक ठरतो. अशा मतदारामुळे नेत्यांची मस्ती वाढते, सत्तेचा गैरवापर होतो आणि भ्रष्टाचार बळावतो. मतदान प्रक्रिया आणि मतदारांच्या मानसिकतेत सुधारणा करणे ही...
error: Content is protected !!