जलधारा प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट बांधकामामुळे आदिवासी महिलांनसह इतर महिलांना उघड्यावरच घ्यावे लागतात उपचार – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट इमारत बांधकामामुळे आदिवासी बहुल भागातील गरोदर माता, स्तंनदा माता आणि बाळंतीण मातेसह लहान बालकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने या भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून अर्धवट इमारत बांधकाम पूर्ण करून या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
किनवट आदिवासीबहुल भागातील जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने इमारत बांधकामास आदिवासी ट्रायबल विभागाकडून दोन कोटी वीस लाख रुपयाची मंजुरी मिळाली. आणि नव्याने इमारत बांधकामास सुरुवाती झाली या इमारतीचे पिल्लर बांधून वर स्लॅब (छत)ही टाकण्यात आले या कामाला जवळपास 20 महिने पूर्ण होऊन गेले मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे आत्तापर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. हे काम अर्धवटच असल्याने या भागातील आदिवासी गरोद...
