Friday, May 15

Tag: in the play ‘Vikramcha Ghadank Ksha’

Vikramcha Ghadank Ksha : ‘विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय -NNL

Vikramcha Ghadank Ksha : ‘विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय -NNL

मनोरंजन, नांदेड
नांदेड| नांदेड येथे आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मध्ये परभणीच्या बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाने कुसुम नाट्यगृहात बुधवारी (ता.४) सादर केलेले ‘विक्रमाचा घातांक क्ष’ हे नाटक प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरले. लेखक रविशंकर झिंगरे यांनी नाटकाच्या माध्यमातून मानवी जीवनातील महत्वाकांक्षा आणि संस्कार यांच्यातील संघर्ष उत्तम पद्धतीने मांडला आहे, तर दिग्दर्शक अतुल साळवे यांनी या गहन आशयाला प्रभावी सादरीकरणातून न्याय दिला आहे. नाटकाचा मुख्य गाभा आहे संस्कारांचे महत्त्व. विक्रम हे पात्र सर्वसामान्य माणसाचे प्रतीक आहे, तर वेताळ हे संस्कारांचे. विक्रमाला स्वतःच्या इच्छांची पूर्तता करताना संस्कार अडथळा वाटतो आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. नाटकात विक्रमाला वेगवेगळे गूढ भास होत राहतात, पण शेवटी संस्कारांचा विजय होतो. “संस्कार कधीच मरत नाहीत,” हा सकारात्मक स...
error: Content is protected !!