Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL
नांदेड। शासनाने नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षकपदी शहाजी उमाप यांची नियुक्ती केली होती. या पदावर सध्या कार्यरत विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची सीआयडी पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र शशिकांत महावरकर हे बदली आदेशाविरूद्ध न्यायालयात (कॅट) मध्ये गेले होते. यावर नुकतीच सुनावणी झालीअसून, शासनाच्या वतीने शशिकांत महावरकर यांना पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती देण्यात आल्यामुळे शहाजी उमाप यांची नांदेड उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहाजी उमाप नांदेडाला तर शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडला लवकरच रुजू होणार आहेत.
गेल्या आठवड्यापासून नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षकपदाच्या बदलीचे नाट्य चांगलेच गाजले आहे. शहाजी उमाप यांच्या नियुक्तीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या अनेकांनी उमाप यांचं अभिनंदन करत स्वागताची तयारी सुरु केली होत...
