Saturday, May 30

Tag: in costume competition

Parmeshwar yatra : श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दुहेरी विजय

Parmeshwar yatra : श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दुहेरी विजय

नांदेड, मनोरंजन
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटीच्या वतीने आयोजित परमेश्वर यात्रा उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत असून त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत श्लोक माने या विद्यार्थ्याने भगवान महादेव यांची आकर्षक व प्रभावी वेशभूषा साकारत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच कु. भाग्यश्री श्रीनिवास बोंपीलवार हिने माता सरस्वतीची मनोहारी वेशभूषा साकारत द्वितीय क्रमांक पटकाविला. कमळाच्या फुलांमध्ये साकारलेली सरस्वतीची प्रतिमा उपस्...
error: Content is protected !!