प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL
कंधार/नांदेड। माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली, यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडून कार्यवाही केली आहे. यावरून आश्रम शाळेत देखील लाचखोरी होत असल्याचे समोर आले आहे.
थोडक्यात हकिकत अशी की, तक्रारदार हे प्राथमिक आश्रम शाळा,गांधीनगर, ता. कंधार,जि.नांदेड येथे वसतीगृह अधीक्षक असून, त्यांचे माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता आरोपी प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली. सदर 5000/- रुपयाची रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना सदरची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. 24/0...
