Voters! Verify names in assembly voter list : मतदारांनो ! विधानसभा मतदार यादीतील नावांची खातरजमा करा -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदान यादीमध्ये नाही, मयत, मृतकांची नावे आहेत, अशा तक्रारी वारंवार करण्यात येतात.मात्र मतदानाच्या पूर्वी निवडणूक विभागामार्फत ज्या मतदान याद्या तयार होतात, त्याबाबत सामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांनी जागरूकपणे लक्ष वेधणे आवश्यक आहे,अशी सूचना प्रशासनाने केली आहे. याबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 6 ऑगस्ट 2024 मंगळवार ते 20 ऑगस्ट 2024 मंगळवारच्या दरम्यान असणार आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मत...
