Leopard Hunted A Deer : सरसम शिवारात बिबट्याने केली हरणाची शिकार; खडकिबाजार शिवारातील विहिरीत मृत हरणाचे पिल्लू आढळले
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून, त्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दि. २९ डिसेंबरच्या रात्री सरसम बु. ते खडकिबाजार पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट्याने हरणावर हल्ला करून शिकार केल्याची घटना घडली.
सरसम बु. येथील शेतकरी संभाजी भुसारे पाटील यांच्या हरभऱ्याच्या शेतात ही घटना घडली. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हरणाचे अवशेष आढळून आले. ही बाब समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, तालुक्यातील खडकिबाजार शिवारात माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांच्या शेतातील विहिरीत एका वर्षांखालील हरणाचे पिल्लू मृत अवस्थेत आ...
