Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| रेल्वे, ट्रैक्टर, टेम्पोने शहरात दाखल जालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल - गोपाल व नवतरुण युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषापूर्ण वातावरणात स्वागत केले. दरम्यान पावसाच्या सारी कोसळल्याने गणरायाच्या स्वागताला वरून राजाही अवतरले असल्याने उत्सवाच्या आनंदात आणखीन भर पडली होती. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेला होता.
श्रावण शुक्ल ४ दि.०७ सप्टेंबर शनिवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी वरून राजाने स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपला...
