A male crocodile was found in a farmer’s field in Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या शेतात आढळली नर प्रजातीची मगर
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे घोटका येथील एका शेतात मंगळवारी पहाटे अंदाजे दीड वर्षे वय असलेले नर प्रजातीची मगर आढळून आली आहे. शेतामध्ये मगर दिसल्याची बातमी पसरतात परिसरात एकच खळबळ उडाली होती. याची माहिती वनविभागाच्या पथकास दिल्यानंतर पथकाने तात्काळ शेतकरी शेषराव कदम यांच्या शेतात येऊन रेस्क्यू करत मगरीला पकडल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली असून मगरीला चिमट्याच्या साहाय्याने पकडल्यानंतर सकाळी 11 वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. सध्या ही मगर वनपरिक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली असून, मगरीला पाहण्यासाठी शाळकरी मुलांसह नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर या मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन...
