Implement rural development : ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर| गावातील पाणीपुरवठा योजना, पाणंद रस्ते, अंगणवाडी व शाळा इमारती, स्मशानभूमी, घरकुल तसेच सौर ऊर्जेच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. ग्रामविकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासकीय यंत्रणांनी ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांतील निवडक गावांमधील नागरिकांशी 'ई ग्रामसंवाद – एक दिवस' उपक्रमांतर्गत ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधला. या वेळी अपर आयुक्त मंजुषा मिसकर, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहायक आयुक्त ज्ञानोबा मोकाटे उपस्थित होते. संवादात संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख...
