Bhagyashree Jadhav : तुम्ही जगण्याची उर्मी द्या, मी निश्चित पदक मिळविन -NNL
नांदेड| माझ्या यशामध्ये डॉक्टर मंडळींचा मोलाचा वाटा आहे. मी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पद मिळवू शकले नाही. याची मला खंत आहे. पण मी डगमगणार नाही. तुम्ही मला जगण्याची उर्मी द्या. भविष्यात मी निश्चित पदक मिळविन असे आत्मविश्वासात्मक उद्गार आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी यापदी निवड झालेली भाग्यश्री जाधव हिने शनिवारी येथे बोलताना काढले.
नांदेड शहरातील महावीर कॉलनी येथील नारायणा सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटलच्या सभागृहात नारायणा फाऊंडेशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरोपिस्टस वुमनसेल नांदेड, रोटरी क्लब नंदीग्राम, निनाद फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर नांदेड या पाच सेवाभावी संस्थांच्यावतीने एका नेत्रदिपक सोहळ्यात भाग्यश्री जाधव हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती. या सोहळ्यास हैद्राबाद येथील ॲपोलो हॉस्पिटलमधील निष्णांत हृदयरोग ...
