प्रलंबित वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल का…! -NNL
हदगाव, शेख चांदपाशा। लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खा नागेश पाटील आष्टीकर यांनी दणदणीत विजय मिळवीत एकतर्फी बाजी मारली आहे. ते हदगाव तालुक्यातील रहवाशी असल्याने हदगाव विधानसभा क्षेत्रात निश्चितच विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने लक्ष देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये वाढली आहे.त्यातच सर्वात महत्वाचा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासुन रखडेलल वर्धा -नादेड हा नवीन रेल्वे प्रकल्प हा हदगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे या रेल्वे प्रकल्पाचे काम हदगाव तालुक्याच्या फार कासव गतीने सुरु आहे. विदर्भात माञ राजकीय दृष्ट्या फार वेगात सुरु आहे यामध्ये ४०%वाटा राज्य शासनाच असुन ६०%केद्र शासनाच आहे. माञ या बाबतीत आता पर्यंत या पुर्वीचे माजी खा. हेमत पाटील यांनी प्रयत्न केले की..? नाही य...
