Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL
हिमायतनगर| हिमायतनगर येथे साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातही ठिक ठिकाणी जयंतीच्या औचित्याने अभिवादन सभा घेण्यात आल्या आणि अन्नदान करण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरात डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने संजीवनी हाॅस्पीटल येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व तसेच परमेश्वर मंदिर परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाळासाहेब खानजोडे , संतोष हातवेगळे, संतोष बनसोडे, सुभाष दारवंडे, गंगाधर गायकवाड, संजय गुंडेकर, अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप गुंडेकर, डाॅ. प्रेमकुमार वाघमारे, सचिन वाघमारे, बालाजी ...
