किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील नऊ मंडळापैकी जलधारा व उमरीबाजार या दोन मंडळामध्ये सोमवारी रात्री (दि.17) दमदार पाऊस झाला तर सिंदगी मोहपूर मंडळात मध्यम आणि किनवट, बोधडी, इस्लापूर, मांडवी, दहेली या मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. शिवणी मंडळात मात्र पाऊस पडला नाही. दरम्यान, मंगळवारी(दि.18) सकाळी आठ पर्यंत संपलेल्या गत 24 तासात संपूर्ण तालुक्यात एकूण 211.20 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची सरासरी 23.5 मि.मी.आहे.
मृग नक्षत्र संपण्याच्या बेतात असताना, तालुक्यात पावसाचे आगमन झाले आहे. गत दोन दिवसापासून किनवट तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून-मधून पडत आहे. मात्र, जलधारा मंडळ वगळता अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी मोठ्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे. यंदा चांगल्या आणि समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, मृगातील पेरा साधण्यासा...
