Degalur ; “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” भव्य महाआरोग्य शिबिर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे संपन्न; ८९३ रुग्णांची तपासणी
देगलूर l देशाचे लोकप्रिय पंतप्रधान जननायक नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान "सेवा पंधरवाडा" आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" या अभियाना अंतर्गत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन श्रीमती शीतलताई रावसाहेब अंतापुरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व उपस्थित मान्यवरांनी सामूहिक अवयव दान शपथ घेतली. यावेळी विविध आजार निदान व उपचारासाठी स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रतीकात्मक स्वरूपात फळवाटप, आयुष्मान कार्ड व वयवंदना कार्ड वाटप देखील करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिरात आज एकूण ८९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मह...
