Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर (बु) लोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ ऑगस्ट डॉ.अनुपस्थित असल्याने एका शेतकऱ्याचा जीव गेला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी मारुती लक्ष्मण सपूरे (रा. कलंबर बु.) यांनी २६ ऑगस्ट रोजी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कलंबर बू.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याने तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संतप्त गावक-यांनी दि.२७ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तिव्र नाराजी व्यक्त केली. ही बातमी समजताच कलंबर सर्कलचे माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी...
