Thursday, May 14

Tag: Habhap. Nivritti Maharaj Indurikar

Nivritti Maharaj Indurikar : गावातील शाळा सुधारा, समाज व देश आपोआप सुधारेल – हभप. निवृत्ती महाराज इंदूरीकर

Nivritti Maharaj Indurikar : गावातील शाळा सुधारा, समाज व देश आपोआप सुधारेल – हभप. निवृत्ती महाराज इंदूरीकर

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे, इतिहास साक्षी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या विचारांचे वारसदार बना, तरच खऱ्या अर्थानं सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केल्याचे फलीत होईल. आज घडीला जिल्हा परीषदेच्या शाळा सुधारणे अतिशय गरजेचे असून गाव पातळीवरील शाळा सुधारल्यास भविष्य काळात समाज व देश आपोआप सुधारेल असा संदेश हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी केला. हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात दिनांक ४ मंगळवारी हभप. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा पार पडला. आपल्या किर्तन सेवेत हभप.इंदूरीकर म्हणाले की, धर्मावर संकट आहे, धर्म संरक्षणासाठी आपण युवकांनी पुढे यावे. देव देश सेवा महत्वाची असून शेतकऱ्यांची पोरं सैन्यात आहे. शेतकरी व सैन्यच ह...
error: Content is protected !!