Siddheshwar Temple Osmannagar ; सिध्देश्वर मंदिर उस्माननगर येथे दीक्षा संस्कार, गुरूमंत्र व सोमवार उद्यापन सोहळ्याचे आयोजन
उस्माननगर l पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना कळविण्यात येते की , उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथे श्री.सिध्देश्वर मंदीरात श्री. ष.भ्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांच्या दिव्य सानिध्यात दिक्षा , संस्कार , गुरूमंत्र , व सोमवार उद्यापन सोहळ्याचे आयोजन दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
विरशैव सांप्रदायामध्ये या विधीला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे. पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना सुवर्णयोगाचा दिन हा ११ ऑगस्ट सोमवार असून ज्या भक्तांना आपले जिवन , दिक्षा संस्कार, गुरूमंत्र व सोमवार व्रत , अशा सद् भक्तांनी उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथे सोमवारी दिक्षा संस्कार गुरूमंत्र घेणाऱ्या सर्व भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दि ११ ऑगस्ट रोजी उस्माननगर येथील सिध्देश्वर मंदिरात वसमत मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात ...
