Wednesday, May 13

Tag: group education officer at Himayatnagar

हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील गटसाधन केंदात कर्तव्यावर असलेले गटशिक्षण अधिकारी शिवानंद शिवाचार्य हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथील गटसाधन केंदातील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. अखेर शिक्षण विभागाला मुहूर्त सापडला. इस्लापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांना हिमायतनगर गटसाधन केंद्राचा बिईओ चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून हिमायतनगर तालुक्यात जवळपास शंभर च्या वर शिक्षकाची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी निट करणे हे नूतन गटशिक्षण अधिकारी यांच्यासमोर अवाहन असणार आहे. तसेच तालुक्यातील दांडी बहाद्दर शिक्षकांना सरळ करून शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गटसाधन केंदात नूतन गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले हे रुजु झाल्यानंतर त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ...
error: Content is protected !!