Wushu Sports Tournament ; राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन – NNL
नांदेड | आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 25 ते 27 ऑक्टोंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन डॉ. हंसराज वैद्य (अध्यक्ष, नांदेड जिल्हा वुशू असो.) यांचे अध्यक्षतेखाली व सोपानजी कटके (सचिव, ऑल महाराष्ट्र वुशू असो.), यांचे हस्ते आज संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी श्रीमती अॅड. अर्चना जांभळे (विधी तज्ञ), जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , एपीआय दिगंबर कांबळे, क्रीडा अधिकारी लातूर उपसंचालक कार्यालयचे डी.व्ही. गडपल्लेवार , राजेश जांभळे (सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो.) श्रीम...
