Rashtrasant tukadoji maharaj : हिमायतनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुसंस्कार शिबिराचा भव्य समारोप
हिमायतनगर (प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त हिमायतनगर येथे आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप गुरुवारी शहरातून भव्य रामधून दिंडी व नामजप सोहळ्याने करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेल्या सात वर्षांपासून हिमायतनगर येथे गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करत आहे. यंदाचे शिबिर २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडले. या शिबिरामध्ये हिमायतनगर तालुक्यातील २० गावांतील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिरात विद्यार्थ्यांना “आपले संस्कार” या विषयासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये ग्रामगीता काळाची गरज, प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण संवर्धन, खेळ – कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट...
