Sunday, May 31

Tag: Gang arrested for stealing jewellery

Gang arrested : नांदेड जिल्ह्यात बसस्थानकांवर महिलांची दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद

Gang arrested : नांदेड जिल्ह्यात बसस्थानकांवर महिलांची दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या अंगावरील व पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण ५,६८,२९० रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत ३० ते ५० वयोगटातील काही महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तपासा...
error: Content is protected !!