‘Swaratim’ University Students ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी घेतले फिल्म मेकिंगचे धडे एफटीआयआयच्या स्मार्टफोन फिल्म मेकिंग कार्यशाळेचा समारोप – NNL
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भारत पातळीवरील नामांकित भारतीय फिल्म व टेलीव्हिजन संस्था (एफटीआयआय) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या एक आठवड्याच्या कार्यशाळेचा समारोप माध्यमशास्त्र संकुलामध्ये अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारोपीय सत्राला विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. रमेश ढगे, प्रा. राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ रोजी या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. दिल्ली, ग्वालियर, मुंबई, पुणे, बिकानेर, अमरावती, सातारा इत्यादी ठिकाणावरून या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थी विद्यापीठात दाखल झाले होते....
