Andaman island ; अंदमान च्या बेटावरून (भाग ५ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक
सकाळी नाश्त्याचे पार्सल सोबत घेऊन आम्ही ईस्टर्न गेट हॉटेल सोडले. एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने पंधरा मिनिटात जेटी वर पोहोचलो. आजचा आमचा प्रवास क्रुझने होणार होता. विमानतळाप्रमाणे या ठिकाणी सर्व तपासणी होते. मॅक्रो क्रूज मध्ये आमच्या सीट रिझर्व केलेल्या होत्या. क्रूझ चा अनुभव बहुतेक जण पहिल्यांदाच घेत होते. प्रशस्त अशा क्रुझ वर एसीमध्ये तीनशेच्या आसपास आरामदायी सीटवर बसण्याची व्यवस्था केलेली होती.अथांग समुद्रात प्रवास करताना अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते. सेल्फी,ग्रुप फोटोला उधाण आले होते. दीड तासाचा प्रवास करून आम्ही हॅवलॉक बेटावर पोहोचलो. गुलामगिरीची प्रतीके...
