Cyber Police : सायबर पोलीस नांदेडच्या सतर्कतेमुळे तक्रारदार यांच्या खात्यातून गेलेले 55 लाख रूपये मिळाले परत -NNL
नांदेड| दिनांक 18/01/2024 रोजी फिर्यादी यांना Wells Capital Whatsaap group वर Foreign Institutional Investor (FII) Wells Capital account च्या माध्यमातुन IPO वर पाच पट फायदा झाल्याचे आमिष दाखविले. सदरचे अॅप SEBI Register असल्याचे व अॅप खरे असल्याचे भासवून फिर्यादी यांना Foreign Institutional Investor (FII) Wells Capital account च्या माध्यमातुन IPO खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना त्यांचे बँक खात्यातून 71 लाख रूपये गेले होते. तक्रारदार यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. तक्रारदार यांनी सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे धाव घेतली.
सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ तक्रारदार यांची तक्रारीची गंभीर दखल घेत. टोल फ्री नंबर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर रजिस्टर करून घेतली व सदरची तक्रार N.C.C.R.P पोर्टलव्दारे स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बँकेचे नोडल अधिकारी यां...
