Warkari couple : पोटा (बु.) गावातील वारकरी दांपत्याचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य सत्कार
हिमायतनगर, अनिल मादसवार| यावर्षीच्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री मा. एकनाथ भाई शिंदे साहेब व त्यांच्या परिवारासोबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या महापूजेचा मान मिळविण्याचे भाग्य पोटा (बु.) येथील मानाचे वारकरी दांपत्य श्री. रामराव बसाजी वालेगावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना लाभले. या अनोख्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते वालेगावकर दांपत्याचा सन्मान करण्यात आला. सत्कार कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर, वारकरी, संतप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “पोटा (बु.) गावासह संपूर्ण तालुका व विधानसभा क्षेत्राचे हे मोठे भाग्य आहे की आपल्या गावातील वारकरी दांपत्याला ...
