Operation Flush Out : ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत एका अरोपीकडून दोन अग्नीशस्त्र दोन जिवंत काडतुस जप्त -NNL
नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य शस्त्र बाळगणारे अरोपीतांची माहिती काढुन त्यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीतील अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोना./2117 धिरजकुमार कोमुलवार, पोना./2543 चाऊस, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड यांना आदेश दिले होते.
दिनांक 31/08/2024 रोजी पो.स्टे. चे डी.बी. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, बाफना टी पॉईन्ट ल...
