Former MP Subhash Wankhede | महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा दावा ! – NNL
हिमायतनगर, दत्ता शिराणे| आगामी विधान सभा निवडणूकीची रंगीत तालीम आता सुरू झाली आहे. इच्छुकांनी आता आपले पत्ते उघड करण्यास सुरूवात केली आहे. परवाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तत्कालीन आमदार माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी ही आपण हदगाव हिमायतनगर विधान सभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगीतले. या अगोदर माजीमंत्री सूर्यकांताताई पाटील यांचे ही नाव इच्छुकांच्या यादीमध्ये अग्रक्रमाने आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.
आगामी विधान सभेच्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्र वादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधान सभेच्या निवडणुकीला सामोरे जातील. हे आता सुनिश्चित आहे. तर भाजपा शिवसेना शिंदे...
