Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
वंदे भारत : स्वप्न सत्यात उतरले!
रात्री ११.३० वाजता आम्ही जम्मू रेल्वे स्टेशनवर हमसफर एक्सप्रेसने उतरलो. एक काळ होता, जेव्हा हमसफर सुरू झाली तेव्हा तिच्या आधुनिक कोचेस, डिझाईन, सजावट आणि सेवांमुळे मी तिच्यावर एक स्वतंत्र लेख लिहिला होता. पण आज... तीच हमसफर पार उडाळलेली, थकलेली वाटली. नवीन कोचेस लावण्याची गरज भासते आहे.स्टेशनबाहेर आलो आणि पावसाने जोर धरलेला. मुसळधार सरी कोसळत होत्या. जड सामान वाहण्यासाठी प्रति लगेज ₹७५ प्रमाणे कुली ठरवले. दोन बसेस तयारच होत्या, पण ५० किमीचे अंतर पार करताना पावसामुळे आम्हाला दीड तास लागला.कटरा रेल्वे स्टेशनवर पोहचून वेटिंग हॉलमध्ये दोन तास विश्रांती घेतली. रोजप्रमाणे पहाटे ५ ला डोळे उघडले. पाऊस थांबलेला होता. त्यामुळे वॉकिंग व प्राणायाम करता आले. थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे सगळा शीण, प्रवासाचा थकवा निघून गेला. (From Amarnath Cave – Part 4 (Author – Dha...

