Wednesday, May 13

Tag: free training for differently-abled

Deepstambh Manobal Kendra : दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

Deepstambh Manobal Kendra : दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

नांदेड, देश विदेश
नवी दिल्ली| दीपस्तंभ फाउंडेशनद्वारे संचालित मनोबल प्रकल्प केंद्राचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी दिल्लीत झाला. या केंद्राद्वारे दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जळगाव आणि पुण्यात यशस्वीपणे कार्यरत असलेला हा प्रकल्प आता राष्ट्रीय राजधानीतही सुरू झाला आहे. उद्घाटन समारोह कस्तूरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक-संचालक यजुर्वेंद्र महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते. राजेश अग्रवाल यांनी नमूद केले की, गेल्या दहा वर्षांत दिव्यांगांन...
error: Content is protected !!