free diagnosis and treatment camp : लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावतीने तामसा येथे रविवारी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर – NNL
हदगाव, शेख चांदपाशा| तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून, रुग्णांची कुठल्याही आजारावरील शस्त्रक्रिया व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त, लघवी चाचणी, ई.सी.जी. सिटीस्कॅन, एम.आर.आय.इत्यादी चाचण्या मोफत करण्यात येणार असणं, रुग्णास हॉस्पिटलला जाण्याचा खर्च, भरती रुग्णांना खाट शुल्क व जेवण मोफत असणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे तामसा येथे आयोजन बाबुराव कदम कोहळीकर (जिल्हाप्रमुख शिवसेना, नांदेड) यांच्या वतीने रविवार ०४-ऑगस्ट -२०२४ रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात पुढील आजाराची तपा...
